जगभरात ‘X’ची सेवा बंद; लोकांकडून तक्रारींचा पाऊस, कंपनीची सर्व्हर दुरुस्त करण्यासाठी पळापळ

X Twitter Is Down : कोट्यवधी लोक वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) काही काळासाठी बंद पडलं. अनेक लोकांना एकसोबत ही अडचण भेडसायला (Down) लागल्यानंतर लोक त्यांच्या समस्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आउटेजची माहिती देणाऱ्या वेबसाइट डाउन डिटेक्टरनुसार, आतापर्यंत अनेक लोकांनी ट्विटरमध्ये समस्या नोंदवल्या आहेत.
कालच एक्स बंद पडल्याच्या बातम्या समोर येत होत्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास, अनेक लोकांनी सोशल मीडिया साइटमध्ये त्यांना येणाऱ्या समस्यांची तक्रार केली. एवढंच नाही तर, आज सकाळी (शनिवार २४ मे) सोशल मीडिया अॅपवर डीएम काम करत नसल्याने वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. यामध्येही अनेक लोकांनी समस्येबाबत तक्रार केली.
बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..
ओरेगॉनमधील हिल्सबोरो येथील एक्स डेटा सेंटरमध्ये आग लागल्यामुळे ही अडचण आली असल्याचीही माहिती समोर आली. ही आग लागल्यानंतर, आपत्कालीन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी, प्राथमिक माहितीनुसार, बॅटरी रूममध्ये आग लागली. या घटनेमुळे सुमारे ६,००० लोकांना X.com सेवांमध्ये समस्या आल्या आहेत.
एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आपल्याला सतत इतर देशांकडून सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. यूकेमधून डाउनडिटेक्टर या स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर ९,००० हून अधिक अहवाल नोंदवण्यात आलं होतं ज्यात वापरकर्त्यांना X वेबसाइट अॅक्सेस करण्यात समस्या येत होत्या. तर अमेरिकेत दर मिनिटाला १७,००० अहवाल नोंदवले जात होते.