आगामी निवडणुकांसाठी भाजप पाठोपाठ अजितदादांचे 40 शिलेदारही मैदानात

ajit pawar यांच्या राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची नावं जाहीर केले आहेत.

Ajit Pawar

Ajit Pawar

Locle body election ncp ajit pawar list for star campaigner : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मात्र सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यात आता भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 साठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या नेत्यांची नावं म्हणजे स्टार प्रचारकांची नावं जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजपनंतर राष्ट्रवादी देखील त्यांच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरायला सज्ज झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या नेत्यांची नावे

अजितदादा पवार, प्रफुलजी पटेल, सुनिलजी तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव-पाटील, अण्णा बनसोडे, इंद्रनील नाईक, अनिल पाटील, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, प्रताप पाटील चिखलीकर, नवाबभाई मलिक, सयाजीराव शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, श्रीमती सना मलिक, रूपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दिकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ टी. कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे, सुनील मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर

छगन भुजबळ स्टार प्रचारक नाही…

या नावांची घोषणा करणारं पत्रक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे हे सर्व आमदार, मंत्री असलेले दिग्गज नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 साठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसणार आहे. त्यांच्या विविध सभांचं आयोजन केलं जाईल. मात्र यामध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांचं नाव नाही. कारण भुजबळांच्या तब्बेतीच्या कारणास्तव त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नुकतीच त्यांची ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ते निवडणुका आणि प्रचार या धावपळीपासून दूर राहणार आहेत. 

 

Exit mobile version