Download App

रामभक्त हे तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील; अजित पवारांच्या टीकेवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Chief Minister Eknath Shinde On ajit pwar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलचं फटकारलं होतं. महत्व कशाला द्यायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की, अयोध्येला, असा सवाला त्यांनी केला होता. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनीही (Ajit Pawar) अयोध्या दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका केली होती. सरकारने केलेला अयोध्येचा दौरा हा फालतूगिरी आहे, असं वक्तव्यं त्यांनी केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येतून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित पवाराजी को क्या बोलू… फालतूगिरी लगती है उसको… अजित पवार विरोधी पक्षनेता है, और उपमुख्यमंत्री रह चुके है, मैं उनको इतनाही कहूंगा की, अयोध्या यात्रा, राम मंदिर जो है… लाखो हिंदू की श्रध्दा है, अगर आप इसको फालतू बोलते है, तो रामभक्त आपको आपकी जगह दिखाएंगे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली.
पंचनामे युद्धपातळीवर करा, अयोध्येतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी रामलल्लांचं दर्शनही घेतलं. दरम्यान, विरोधकांनी या अयोध्या दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्यात जनेतचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले, अशी टीका अजित पवारांनी केली होती. जनतेच्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हा अयोध्या दौरा फालतुगिरी आहे, असं विधान अजित पवार यांनी केलं, असा आरोप केला जातोय. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पटलवार केला. प्रभू रामचंद्राचे भक्त हे तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांनीही आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, हे सगळं करत असतांना काही राज्याचेही महत्वाचे प्रश्न आहेत. मला अशी माहिती मिळाली की, मी या अयोध्या दौऱ्याला फालतू म्हटलो. मात्र, मी असलं काहीही म्हणालो नाही. कुठलेही बाईट्स, भाषण, प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला कळेल की, मी असं बोललोच नाही. उगाच ध चा मा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असं पवार म्हणाले.

Tags

follow us