पंचनामे युद्धपातळीवर करा, अयोध्येतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

पंचनामे युद्धपातळीवर करा, अयोध्येतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

राज्यात सुरु असलेल्या अस्मानी संकटामुळे राज्यातला शेतकरी चांगलाच अर्थिक सापडला आहे. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे मूह में राम, बगल में छुरी; चंद्रकांत खैरेंचे टीकास्त्र

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. यासंदर्भात माझं सकाळपासून राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलणं सुरु आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांत तर जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर, पाहा PHOTO

शेतकऱ्यांच्या झालेल्या नूकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करण्याबाबतच्या सूचना दिल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, सलग दोन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. तर पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत अवकाळीचं सावट राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय.

गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या अयोध्या दौऱ्यातील फरक’

यामध्ये विशेषत: जालना, नांदेड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसलाय. तर बीड आणि कन्नडमध्ये गारपीटीचा तडाखा बसला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जवळपास एक तासभर पाऊस सुरु होता.

अवकाळी पावसाचा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसत असून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube