मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला अयोध्याचे महंत आले होते. त्यांनी शिंदे यांना अयोध्या येण्यासाठी आमंत्रण दिले. यावर आपणही लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या आमचा प्रेरणा स्थान आहे. अयोध्या हा श्रध्देचा विषय आहे, आम्ही नक्कीच अयोध्याला जाऊ. तिथे येऊन आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. अयोध्याचे महंत यांच्या शब्दाला आम्ही नक्कीच मान देऊ आणि आम्ही अयोध्याला जाऊ असे शिंदे म्हणाले.
तत्पूर्वी अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली.या भेटी दरम्यान त्यांनी शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं.
राज्यात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला यावं, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केल्याचं शिंदेंनी सांगितलं. अयोध्येतील महंतांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.