Eknath Shinde & Amit Shah गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यात आपल्या गावी मुक्काम ठोकून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी आज साताऱ्याहून थेट नागपूरला रवाना होणार आहे. अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नागपुरात भेट होणार आहे
मागच्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना जवळ करण्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. असं सांगितलं जात आहे.
Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
याशिवाय राज्यात भाजपकडूनही पदांच्या अदलाबदलीची चर्चा केली जात आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमत्री करून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यंमत्री करण्यात यावं अशी चर्चा होत आहे. तर येत्या काही दिवसात सत्तासंघर्षावरही सुप्रीम कोर्टाकडून निकाल येणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये सध्याच्या घडामोडींवर राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांनतर लगेचच हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. ते आजपासून दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. अमित शाह गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत.
Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं