Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

Mumbai-Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज 25 एप्रिलपासून 10 मेपर्यंत म्हणजे पुढील दोन आठवडे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ठराविक वेळेत बंद राहणार आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

त्यामुळे तुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गावरून दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. परशुराम घाटातील रस्त्याचं रूंदीकरण आणि उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ही वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या या घाटातील रस्त्य्या चौपररीकरण सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी आता वेगाने काम सुरू झाले आहे.

विद्यापीठात तोडफोड करणं पडलं महागात ABVP च्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल…

दरम्यान परशुराम घाट बंद असताना या मार्गावरील पर्यायी वाहतूक ही कळंबस्ते-चिरणी मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र या कालावधित बाहेरून येणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने न गेल्यास मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube