विद्यापीठात तोडफोड करणं पडलं महागात ABVP च्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल…

Governor, Chancellor Ramesh Bais announced the appointment of Vice-Chancellors for Mumbai, pune and konkan University

Pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग चित्रीकरण व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, आंदोलन करत असताना तोडफोड, घोषणाबाजी सोबत केलेल्या गोंधळामुळे यामुळे विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय – 50) यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आंदोलकाविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी 20 जणांवर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये गंगा माधव, अंबादास अभिनवे, अनिल ठोंबरे, अमोल देशपांडे अभिनव बचाल व अन्य एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune University : विद्यापीठ चौकातून प्रवास करणाऱ्यांनी ‘या’ बदलाकडे लक्ष द्या 

सोमवारी विद्यापीठाच्या आवारात रॅप सॉंग चित्रीकरण विरोधात व आपल्या काही मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठ सुरक्षा रक्षक आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दरवाजांना धक्के दिले व घोषणाबाजी करत मुख्य दालनात (बैठक कक्षात) घुसले आणि कागद फडत गोंधळ घातला यावेळेस जमावबंदीचा ही आदेश पाळला नाही, असे दळवी यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल काही राजकीय नेत्यांनी देखील निषेध नोंदवला असून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर काल रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.

Tags

follow us