Download App

राहुल कलाटे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • Written By: Last Updated:

MVA Candidate Rahul Kalate Vote With Family : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election 2024) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी घरात देवदर्शन केले. वडिल वाकडचे प्रथम नगरसेवक दिवंगत नेते तानाजीभाऊ कलाटे यांच्या प्रतिमेचे दर्शन तसेच आई माजी नगरसेविका कमल कलाटे यांचे आशीर्वाद घेऊन आज सकाळी 8 वाजता कमल प्रतिष्ठान संचलित माउंट लिटेरा स्कुल, वाकड या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला.

सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकतो ; तावडेंवरील आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उमेदवार राहुल कलाटे म्हणाले, या निवडणुकीत जनतेने मला खूप मनापासून साथ दिली. खूप प्रेम दिले. या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देत, विकासकामांचे मुद्दे जनतेसमोर मांडले. भविष्यातील ५ वर्षांत या मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याबद्दलचे व्हिजन मी मतदारांसमोर मांडले.

सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकतो ; तावडेंवरील आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

लोकनेते औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड शहाराचे जनक शरदचंद्रजी पवार साहेब तसेचं दूरदृष्टी नेतृत्व हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांचे विकासाचे व्हिजन घेऊन मी लोकांसमोर गेलो. त्यामुळे मला खात्री आहे, की यावेळी मतदारराजा मला आपल्या सेवेची संधी देणार आहे. मी मतदारसंघातील सर्व बंधू-भगिनींना आवाहन करतो, की जास्तीत जास्त मतदान करा. मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या.

 

follow us