पुणे : महाविकास आघाडीने ही जागा जिंकून राज्याला एक वेगळा मेसेज दिला आहे. असंच चिंचवडलाही घडली असती पण तिथे राहुल लकाटे यांच्यामुळे तेथे मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला. त्यांना भाजप शिंदेंनीही सहकार्य केलं. पण त्यामुळे आमचा पराभव झाला असं नाही दोन्ही जागा भाजपच्या आणि सहानुभूती होती. पण या ऐवजी महागाई, बेरोजगारी आणि शिवसेनेचं चिन्ह काढून घेतल्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली ते कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयानंतर बोलत होते.
त्याचबरोबर यावेळी सांगितलं की, चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांचे साधारण निकाल समोर येईपर्यंत त्यावर बोलणे उचित नव्हते म्हणून मी काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खूशी थोडा गम अशा झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो. 1995 पासून भाजपच्या आधी गिरीष बापट आणि मुक्ता टिळकांनी जिंकल्या. मात्र यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने महाविकास आघाडीने योग्य उमेदवार दिला. तिथेच आम्ही आर्धी लढाई जिंकलो होतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली ते कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयानंतर बोलत होते.
`Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`
मी अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं. रवींद्र आधी मनसेमध्ये होते. आता कॉंग्रेसमध्ये आहेत ते तळागाळातील लोकांना मदत करणारे कार्यकर्ते आहेत. महापलिकेत देखील त्यांनी भाजपच्या ताकदीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून मूठ बांधण्यात यशस्वी झालो. शिंदे-फडणवीसही येथे सभा बैठका घेत होते. भाजप शिंदे गटाने सर्व प्रकारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात धंगेकरांनी आंदोलनही केलं. पण तरी देखील भाजपची प्रस्थापित जागा गेली आहे.