Chitra Wagh on Sanjay Raut ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मयुर शिंदे (Mayur Shinde) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयुर शिंदे हा सुनील राऊत यांच्या जवळचा असून राऊत यांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचल्याची माहिती मुंबई पोलिस सुत्रांनी दिली. दरम्यान, मयुर शिंदे याला पोलिसांनी अटक करताच संजय राऊत हे भाजप आणि मनसेच्या निशाण्यावर आलेत. आमदार नितेश राणेंसह प्रसाद लाड यांनी राऊतांवर टीका केली. तर आता भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही राऊतांवर हल्लाबोल केला. (Chitra Wagh criticizes Sanjay Raut, a stuntman, he made a desperate attempt to gain fame after being threatened)
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत राऊतांवर टीका केली. व्वाह रे नौटंकीबाज ! जीवे ठार मारण्याचा फोन आल्याचं मोठ्ठं भांडवल सर्वज्ञानी संजय राऊतांनी केलं… आणि धमकी देणारा कोण निघाला तर त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता. याचा अर्थ काय? आपल्याच कार्यकर्त्याला धमकी द्यायला सांगून केविलवाणी प्रसिद्ध मिळवायची आणि सरकारला बदनाम करण्याचा रडीचा डाव खेळायचा, अशी घणाघाती टीका वाघ यांनी केली.
व्वाह रे नौटंकीबाज ! @rautsanjay61
जीवे ठार मारण्याचा फोन आल्याचं मोठ्ठं भांडवल सर्वज्ञानी संजय राऊतांनी केलं… आणि धमकी देणारा कोण निघाला तर त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता.
याचा अर्थ काय?
आपल्याच कार्यकर्त्याला धमकी द्यायला सांगून केविलवाणी प्रसिद्ध मिळवायची आणि सरकारला बदनाम…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 15, 2023
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना त्यांच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. सुनील राऊत यांना अज्ञात व्यक्तीने हा कॉल केला होता. सुनील राऊत यांनी फोन उचलताच या अज्ञात व्यक्तीने थेट संजय राऊत आणि सुनील राऊत यांना सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा, अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांना गोळ्या घालू, अशी धमकी दिली होती. दरम्यान, या धमकीनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.
कर्नाटकात काँग्रेसचा भाजपवर पहिला वार; धर्मांतर विरोधी कायदा अन् हेगडेवारांचे प्रकरण काढले
आता या धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली. मुयर शिंदेच्या अटकेनंतर या प्रकरणी वेगळीच चर्चा सुरू आहे. शिंदे हा राऊत यांचाच माणूस असल्याचं बोलल्या जातं आहे. राऊत बंधूसोबतचे त्याचे फोटोही व्हायरल झालेत. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंदे याने हा बनाव रचला होता. खुद्द मयूर शिंदे याने फोन केला नाही. मात्र, मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मयुर शिंदे हा यामागचा मुख्य सूत्रधार असून त्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना हा कॉल करण्यास सांगितले होते. दरम्यान, याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहावे लागेल.