बावनकुळेंच्या ‘कसिनो’तील फोटोला नाना पटोलेंचा व्हिडिओ शेअर करत चित्र वाघ यांचे प्रत्त्युत्तर

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर शेअर केला आहे. बावनकुळे यांचा हा कथित फोटो समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपसह चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा […]

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर शेअर केला आहे. बावनकुळे यांचा हा कथित फोटो समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपसह चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘सर्वज्ञानी संजय राऊतजी… सोशल मीडियावर मोठ्या उत्साहात व्हायरल झालेल्या या व्हिडिओकडे लक्ष द्या. यावरही तुमच्या डिटेक्टिव्ह एजन्सीच्या माध्यमातून या व्हिडिओची माहिती गोळा करा, ज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षासारखा चित्रातील व्यक्ती कोणासोबत आणि कोणत्या हॉटेलमध्ये फिरत आहे? याचा पण नाना पटोलेंनी तपास करायला हवा आणि तोही सीबीआयच्या माध्यमातून’, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लागवला आहे.

‘हॉटेलमध्ये रेस्टॉरंट अन् कसिनो एकाच..,’; व्हायरल फोटोवर बावनकुळेंची सारवासारव

काँग्रेसने देखील बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्सवर म्हटलं की, ‘दिवाळी स्पर्धा! एका पत्याच्या pack मध्ये किती पत्ते असतात? अचूक उत्तर देणार्‍यांना Macau trip भेट.’ या कॅप्शनसह चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो शेअर केला आहे.

बावनकुळे मकाऊमध्ये तीन पत्ती खेळत असल्याचा फोटो काँग्रेसकडून शेअर

यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण आहे आहे. ते म्हणाले की, ‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.’

Exit mobile version