Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. (BJP) यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. आदित्य ठाकरे थांबलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलबाहेर हा सर्व प्रकार घडला. भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार
पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
परिस्थितीचं गांभीर्य बघता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. महत्त्वाचं म्हणजे घटनेची माहिती मिळतात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पोहोचत भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाल.#bjpvsshivsenaubt #ChhatrapatiSambhajinagar #adityathackeray pic.twitter.com/2LRqsBULaO
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 26, 2024