Download App

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पोलीस-आंदोलकांमध्ये बाचाबाची

सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठीकाणी काही दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी सरकारने परवानगी दिली नव्हती. पण या लोकांनी पहाटेच्या वेळी हा पुतळा बसवला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. कारण या पुतळा बसवणाऱ्यांनी या ठीकाणी महा आरतीचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर या परिसरात कलम 144 देखील लागू करण्यात आले होते.

पोलिसांकडून हा अनधिकृत पुतळा हटवण्यात येणार असल्याचे कळताच या आंदोलकांनी महा आरतीचे आयोजन कतरण्यावर आपली ठाम भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलकांनी सांगली- इस्लामपूर रस्त्यावर ठिय्याआंदोलन सुरु केले होते. यामुळे परिसरात काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे येथे काही काळ तणाव होता.

Tags

follow us