हवेत गोळीबार करायचे आणि पळून जायचं; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना जोरदार चिमटा

CM Devendra Fadanvis : . विरोधकांनी माहिती आणि पुराव्यासह आरोप करावेत. हवेत गोळीबार करायचे आणि पळून जायचं हे योग्य नाही.

Devendra Fadnvis

Devendra Fadnvis

CM Devendra Fadanvis Slams Opposition: उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2026) सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना(उबाठ) व काँग्रेसतील पक्षाने नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप केले आहे. त्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांनी माहिती आणि पुराव्यासह आरोप करावेत. हवेत गोळीबार करायचे आणि पळून जायचं हे योग्य नाही. ते सभागृहात आरोप -प्रत्यारोप करतील, त्याला आम्ही उत्तर देऊच, असा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026’च्या पूर्वसंध्येला सरकारची पत्रकार परिषद झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, विरोधक सातत्याने जनादेशाचा अवमान करत आहेत. सत्ताधाऱ्यांना माज चढला अशी भाषा वापरून जनादेशाचा अवमान होत आहे. आम्ही नम्रपणे जनते जात आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत लोकांना आम्हाला जनादेश दिला आहे. त्यातूनही विरोधक शिकत नाहीत.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात बारा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा विरोधक करत आहे. आम्ही पैसे दिले नाहीत. तेच पैसे लावतात. ज्यांनी कामे केली नाहीत, त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे. पाच बँकेची बॅंक गॅरुंटी फेक आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आता कामे दुसराला दिले जाणार आहे. आरोप करा माहितीसह आणि पुराव्यासह करा, असे प्रत्युत्तरही फडणवीसांनी केलाय.


पत्रातील भाषेवरून आदित्य ठाकरेंना चिमटा

विरोधकांचे सहा पानाचे आणि अठरा मुद्द्यांचे पत्र मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही पत्रावर घेतली आहे. जागतिक मातृभाषा दिनी मातृभाषा इतक्या चुका आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंना हे पत्र दाखवायला हवे होते. त्यांच्याकडे एक्सपर्ट आहेत. त्यांनी चुका दुरुस्त करून पत्र दिले असते. त्या पत्रामध्ये बातम्यांचे पॅराग्राफ टाकले आहे. स्वतःची भाषाही वापरलेली नाही, असे फडणवीस म्हणाले.

Exit mobile version