Cm Devendra Fadanvis On Maratha Reservation : अध्यादेशामुळे सरसकट आरक्षण देत नाही, ज्यांच्याकडे पुरावा त्यांनाच प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश मदत करत असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांनी केलंय. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काढण्यात आलेल्या जीआरवरुन राज्यात धुमशान सुरु आहे. एकीकडे ओबीसी समाजाकडून जीआरला विरोध केला जातोयं, तर दुसरीकडे मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जीआरमुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात होती. त्यावर बोलताना फडणवीसांनी आपली भूमिका मांडलीयं.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने काढलेला अध्यादेश विचारपूर्वक काढला आहे. हा जीआर कायदेशीर आहे. अध्यादेशामुळे कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. जो खरंच कुणबी आहे त्यालाच प्रमाणपत्र मिळण्यास अध्यादेश मदत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.
आम्ही सरसकट आरक्षण दिलेलं नाही, नीट जीआर वाचा…
जीआर कायदेशीर असून न्यायालयात राज्य सरकारकडून आम्ही योग्य भूमिका मांडणार आहोत. सरकारचा अध्यादेश ओबीसी बांधवांनी नीट वाचावा. कुठेही सरसकट आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोकं अर्ज करतील त्यांचा पुरावा योग्य असेल तर आरक्षण मिळणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी जीआर संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीयं. तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या जीआरवर आक्षेप घेत न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही ओबीसी नेत्यांना जीआर समजावून सांगत आहोत, त्यांचं समाधान झालंय. पण कोणाला राजकीयदृष्ट्या काम करायचं असेल तर त्यांना मी थांबवू शकत नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
पोलिसांनी घेतलं मनावर..बंडू आंदेकरला मध्यरात्री नाना पेठेत आणून घराची झाडाझडती…
ज्यांचा पुरावा नाही, त्यांच्यासाठी नवीन रस्ता शोधलायं…
मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून खोटी प्रमाणपत्रे जात बदलू शकत नाहीत. सरसकट मराठा समाजाला ओबीसीत घेणं बेकायदेशीर आहे. न्यायालयाने याआधीच मराठा समाजाला मागास ठरवलंय. मराठा आरक्षण जीआर हा ओबीसींसाठी अडचणीचा आहे. कुणबी समाजासाठी हैद्राबाद गॅझेट मग बंजारा समाजासाठी का नाही? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी सरकारला केलायं.
तसेच मराठा समाज राज्यातला सर्वात मोठा समाज आहे. मनोज जरांगेंनी जीआरमधून पात्र शब्द काढायला लावला आहे. मराठा आरक्षण जीआर दबावाखाली काढला आहे. कुणबी नोंदी नाही त्यांच्यासाठी नवीन रस्ता शोधला. जात प्रमाणपत्र जातीला दिलं जातं समाजाला नाही, असाही आक्षेप छगन भुजबळ यांनी घेतलायं.