Eknath Shinde on Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळी करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. शिंदेंसोबत 40 हून अधिक आमदार होते. या सर्व आमदारांना घेऊन सत्ता स्थापनेआधी शिंदे गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, गुवाहाटीला जात असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला धमकी दिली होती, असा आरोप शिंदेंनी केला. मात्र, मी कोणाला घाबरत नाही, असंही ते म्हणाले.
संजय गायकवाडांसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल, तलवारीने केक कापणं आलं अंगलट!
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही 2022 मध्ये गुवाहाटीला गेलो, तो आमच्या रणनीतीचा एक भाग होता. त्याचवेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. मी रस्त्यात असताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरलीत. तुम्हाला वरळीतूनच यायचं आहे, अशा धमक्या दिल्या होत्या. अरे धकम्या कोणाला देता, मी कोणाला घाबरत नहाी, असं शिंदे म्हणाले.
भाजपने ठाकरेंना आश्वासन दिलं नाही…
पुढं ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना भाजपकडून कोणतेही आश्वासन मिळालं नव्हतं. भाजपच्या वरिष्ठानी मला सांगितलं की, मित्रपक्षाला जर मुख्यमंत्रीपद द्यायचं ठरलं असतं तर अडीच वर्षांची अडचण नव्हती. मित्र पक्षाचे कमी आमदार निवडून येऊनही इतर राज्यात असा प्रयोग आपण केला. ज्या दिवशी विधानसभेचे निकाल आले, त्यादिवशी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भाजपशी युती ठेवून चालणार नाही, हे उद्धव ठाकरेंना समजले होतं. त्यामुळं त्यांना महाविकास आघाडीचा पर्याय समोर आणल्याचं शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचं अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं. जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार कला असता. तुम्ही म्हणालात, मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मग म्हणालात की,शरद पवारांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. मला एकदा विश्वासात घेऊन असतं तर मी सगळा माहोल तयार केला असता. ठाकरेंनी सर्व काही अत्यंत गुप्तपणे केले. पण या गोष्टी लपून राहत नाहीत. मला शरद पवार म्हणाले की, हा सर्वस्वी शिवसेनाचा प्रश्न होता, अस शिदे म्हणाले.
मराठा समाजाचा मविआकडून राजकीय हत्यार म्हणून वापर
मराठा आरक्षणावर बोलतांना शिंदेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडून राजकीय हत्यार म्हणून वापर होतोय, अशी टीका शिंदेंनी केली. ते म्हणाले, राज्यातील मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यावेळी उच्च न्यायालयातही आरक्षण टिकलं होतं. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्याकाळात कोर्टात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू योग्य प्रकारे माडंली नाही, मात्र, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही 10 टक्के आरक्षण दिलं, असं शिंदे म्हणाले.