Eknath Shinde : चाळीस वर्षापासून मी शिवसेनेत (Shivsena) आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माझ्यावर अविश्वास दाखवला. सरकार आलं तेव्हा त्यांनी जर मला सांगितलं असतं की, मला मुख्यमंत्री व्हायचंय. तर मी सगळा माहोल तयार केला असता. मात्र, त्यांनी सीएमपदासाठी जे काही गोष्टी केल्या, त्या गोपनिय पद्धतीने केल्या. मला विश्वासत न घेता केल्या. मी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना उद्धव ठाकरे माझ्या खात्यात ढवळाढवळ करत होते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shide) केला.
‘मला अटक करण्याचे वरून आदेश होते, परमबीर सिंह यांच्या दाव्यात तथ्य’, CM शिंदेंचा खुलासा
माझ्या झेड प्लस सुरक्षेला ठाकरेंचा विरोध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना मला तेव्हा धमक्या आल्या होत्या, कारण त्यावेळी मी नक्षलवाद्यांना संपवण्याचे काम केलं होतं. त्यामुळं मला झेड सुरक्षा मिळणार होती. गृहमंत्र्यांनी मला झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता. उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्याना फोन करून तशी सुरक्षा देऊ देऊ नका असं सांगिल्याचा दावा सीएम शिंदेंनी केली.
… म्हणून नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल, दिलीप वळसेंकडून विधानसभेचे पिक्चर क्लिअर
त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचाही प्रयत्न झाला, असं शिंदे म्हणाले. मी ठाकरेसोबत मंत्रिमंडळात होतो. चाळीस वर्षापासून मी शिवसेनेत आहे. पण, मलाही अटक करण्याचा झाला होता, असा दावा शिंदेंनी केला.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचं अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं. जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता. तुम्ही म्हणालात, मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मग म्हणालात की,शरद पवारांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. मला एकदा विश्वासात घेऊन असतं तर मी सगळा माहोल तयार केला असता. उद्धव ठाकरेंनी सर्व काही अत्यंत गुप्तपणे केले. पण या गोष्टी लपून राहत नाहीत. मला शरद पवार म्हणाले की, हा सर्वस्वी शिवसेनाचा प्रश्न होता, अस शिदे म्हणाले.