Download App

केसरकरांचा गौप्यस्फोट ; Eknath Shinde यांची ठाकरेंना होती ऑफर…

मुंबई : शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे जे काही म्हणणं आहे ते सुप्रीम कोर्टात (Supreme Court) किंवा निवडणूक आयोगात (Election Commission) सांगाव. केवळ सहानुभूती मिळवण्याकरिता हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर मत मिळवावी. ठाकरेंना काय वाटते ते महत्वाचे नाही, तर सुप्रीम कोर्टाने असे कोणते देखील आदेश दिले नाही. ते उद्धव ठाकरेंचे का ऐकणार असा प्रश्न बंडखोर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला.

उद्धव ठाकरेंची सध्या सुरु असलेली सर्व धडपड व्यर्थ असल्याचं सांगितलं, तुम्ही जे म्हणताय ते सगळं खरं का ठरणार, लोकांना खर काय ते समजायला हवे. भाजपाबरोबर बोलणी सुरु होती, त्याचे प्रत्यक्ष आम्ही साक्षीदार लोक आहोत. मी काय कोणी मोठा मनुष्य नाही, पण मी ते घडवून आणल होत. पक्षाच हित म्हणून ते केले. पंतप्रधानांशी भेट घडवून आणली, त्यावेळी बोलणी केली आणि ती चूक दुरुस्त करायची संधी मिळाली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी मधून बाहेर पडणार होते, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी यावेळी केला.

ठाकरे कुटुंबावर जे काही आरोप झाले, त्याने ते दुखावले गेले असतील पण दुखावले गेले म्हणून अस वागणे चुकीचे वाटते. आज देखील तुम्ही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ, असे मी त्यावेळेस सांगितले होते. पंतप्रधान आणि बाळासाहेब यांच्यात एक वेगळे बॉंडिंग होते, असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा अस म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंची पण तुम्ही दखल घेतली नाहीत. उद्धव ठाकरे दिल्लीवरून कबूल करून आले होते की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो पण त्यांनी तस केलं नाही, असा आरोप केसरकर यांनी केला.

Tags

follow us