Abhijit Bichukale यांची पुन्हा वादावादी, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Abhijit Bichukale यांची पुन्हा वादावादी, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

बिग बॉस ( Big Boss ) फेम अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale ) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी ( Kasaba byelection ) अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांची एका व्यक्तीसोबत वादावादी झाली असून सदर व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटलांवर त्यांनी शाई टाकली, ते माझ्यावर अंगावर रॉकेलही टाकू शकतात, असे बिचुकले म्हणाले आहेत. ते लोक माझे फोटो काढण्यासाठी आले होते. मी त्यांना काही वेळ थांबायला सांगितले. यावरुन त्यांनी माझ्याशी वाद घातल्याचे बिचुकले म्हणाले.

यावर लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमचे उमेदवार अनिल हतागळे यांचा उमेदावारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो. यावेळी आम्ही बिचुकले यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेलो असता फोटो काढण्याच्या वेळेस त्यांनी माझ्या गळ्यातील आमच्या पक्षाचा शेला काढायला लावला. यावरुन आमच्यात वाद झाला, अशी प्रतिक्रिया इंगळे यांनी दिली आहे.

मी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सच्चा कार्यकर्ता आहे. मी त्यांचा अपमान सहन करु शकत नाही. यावरुन माझा बिचुकले यांच्याबरोबर बराच वाद झाला, मी त्याला शिवीगाळ देखील केली, असे इंगळे म्हणाले आहेत. बिचुकले यांनी मात्र या प्रकणावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, याची मागणी केली आहे. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट देखील होऊ, शकते असे बिचुकले म्हणाले आहेत.

दरम्यान बिचुकले यांचा काल देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांचा पुणे येथे पत्रकारांशी वाद झाला होता. आज देखील पत्रकारांशी बोलताना त्यांचे खटके उडाल्याचे पहायला मिळाले. बिचुकले यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरल्याने या निवडणुकीत आणखी रंगत येण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube