Download App

‘मला अटक करण्याचे वरून आदेश होते, परमबीर सिंह यांच्या दाव्यात तथ्य’, CM शिंदेंचा खुलासा

एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा दावा त्यांनी होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी काही दिवसांपूर्वी मोठा दावा केला. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा दावा त्यांनी होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केले.

पौडवाल, लांजेकर यांचा होणार गौरव, ‘या’ दिवशी पार पडणार राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना अटक करायची हे माझ्यासमोरच ठरलं होतं. फडणवीसांना अटक केली की भाजप बॅकफुटवर जाईल आणि भाजप आमदार मविआत येतील, त्यामुळं महाविकास आघाडी मजबूत होईल, असं ठरलं होतं. मी फडणवीसांच्या अटकेला विरोध केला होता. पण, फडणवीस त्रास देतात त्यामुळं त्यांना अटक केलीच पाहिजे, यावर मविआ नेते ठाम होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, कोंडी करणं हे मी समजू शकतो. मात्र, मी तर त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. चाळीस वर्षापासून मी शिवसेनेत आहे. फडणवीसांसोबत मला अटक करण्याचा प्रयत्न होता. यात तथ्य होतं. कारणं मी जेव्हा याची परमवीर सिंह यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनीही अटक करण्याचे वरून आदेश होते, असं सांगितलं. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं, असं शिंदे म्हणाले.

जरांगे CM होणार, पण सीएम झाल्यावर शिव्या देऊन चालत नाही, त्यामुळे वागणं सुधारा; भुजबळांचा खोचक टोला 

फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नसते
यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना चॅलेज मानत नाही. मी त्यांच्यासोबत काम केलं. घरात बसून सरकार चालवलं जात नाही. फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नसते. त्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं, असाही शिंदेंनी लगावला.

विकासाचे अनेक प्रकल्प मविआने अडवले

पुढं ते म्हणाले, मी माझ्या कामावर फोकस असतो. ते मात्र सतत टीका करत राहतात. सरकार आज पडेल, उद्या पडेल असं ते सांगत असतात. मात्र, आजही सरकार मजबुतीने काम करत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने अडवले होते. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ते सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. मेट्रो, कोस्टल रोड हे सगळे प्रकल्प महायुती सरकारने सुरू केल्याचं शिंदे म्हणाले.

follow us