CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. मागून येऊन अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अर्थमंत्रीपदही अजित पवारांकडे गेल्यानं शिंदे गटात आणखीचं अस्वस्थता पसरली. आता मुख्यमंत्री बदलले जाणार, अजित पवार सीएम होणार, असंही मविआतील (MVA) नेते बोलत होते. दरम्यान, आज विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं. (CM eknath shinde on pruthviwaj chavhan over post of chief minister)
आज सभागृहात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेले वर्षभर सरकार पडणार, सरकार पडणार… मुख्यमंत्री बदलणार अशी घोषणा महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिल्या. ते रोज सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करायचे. सगळे नवीन नवीन ज्योतिषी शोधत होते. पृथ्वीराज चव्हाण तर माझ्या मागेच लागले होते. आमचे चांगले संबंध असूनही ते सांगायचे मुख्यमंत्री बदलणार. नाना पटोलेही सरकार पडणार असं बोलायचे. पण, सरकार काही पडलं नाही. तर उटल सरकार अधिक मजबूत होत गेलं. आमच्याकडे १७० आमदारांचं पाठबळ होतं. आता अजित पवारही सोबत आले, असं शिंदे म्हणाले.
ना विजयाचा उन्माद ना विरोधकांवर टीका; ‘सर्वोच्च’ निकालानंतरही राहुल गांधी स्थितप्रज्ञ
यावेळी बोलतांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली. ते म्हणाले, राज्यात आपलं सरकार आल्यावर १ लाख १८ हजार कोटींची परकीय गुंतवणूक राज्यात झाली. त्याआधी परकीय गुंतवणूकीच्या बाबतीत कर्नाटक आणि गुजरात आपल्या पुढं होतं. आता महाराष्ट्र नंबर एकवर आहे. ७० ते ८० हजार कोटींच्या प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू झाली. महाविकास आघाडीच्या काळात दावोसमध्ये किती करार झाले? किती गुंतवणूक झाली? कितीची अमंलबजावणी झाली? मला त्याविषयी काही माहिती नाही. जनतेला सगळं ठाऊक आहे. मविआच्या काळात किती प्रकल्प आले. मविआने ज्या प्रकल्पांना स्थगिती देऊन राज्यातील जनतेचं मोठं नुकसान केलं. पण, या प्रकल्पांवरची स्थिगिती आपल्या सरकाराने उठवली. हे सरकार परफॉर्मन्स करणारं सरकार आहे. २४ तास काम करणारं सरकार आहे. केवळ फेसबुक लाईव्ह अन् घरी बसून काम करणार सरकार नाही, असा चिमटाही त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला.