ना विजयाचा उन्माद ना विरोधकांवर टीका; ‘सर्वोच्च’ निकालानंतरही राहुल गांधी स्थितप्रज्ञ

ना विजयाचा उन्माद ना विरोधकांवर टीका; ‘सर्वोच्च’ निकालानंतरही राहुल गांधी स्थितप्रज्ञ

Rahul Gandhi Defamation Case : मानहानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने खडे बोल देखील सुनावले आहेत. कोर्टाचा निकाल आल्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. पण प्रतिक्रिया देताना राहुल गांधींच्या चेहऱ्यावर ना विजयाचा उन्माद दिसला ना विरोधकांवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, ‘आज नाही तर उद्या सत्याचा विजय होतो. मला काय करायचे आहे, माझ्या मनात सर्वकाही स्पष्ट आहे.’

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की ‘आमची जबाबदारी पूर्वीसारखीच राहणार आहे. भारताच्या संकल्पनेचे रक्षण करणे हे आमचे ध्येय आहे.’ राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांत ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. यापूर्वी जसा आवाज उठवत होतो, तेच भविष्यातही करणार असल्याचे सांगत आपल्या भूमिकेत कोणताही फरक पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi : 134 दिवसांच्या कायदेशीर लढाईला यश; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे 5 अर्थ

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज लोकशाहीचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत 4000 किलोमीटरचा प्रवास केला होता, त्यांनी गरीब, शेतकरी, तरुण, इंजिनियर अशा सर्वांची भेट घेतली होती, त्यांच्या वेदना समजून घेतल्या होत्या. त्यामुळे आता वाटते की त्या लोकांची प्रार्थना कामी आली.

राहुल गांधींच्या खासदारकीची वाट अद्यापही बिकटच! राष्ट्रवादीच्या सदस्याला 2 महिने पहावी लागली होती वाट

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की, या प्रकरणी पूर्ण सुनावणी होईपर्यंत राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली जाईल. याचा अर्थ राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिल्यापासून काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत, ढोल वाजवले जात आहेत.

सुप्रीम कोर्टाने फटकारले
राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षा का देण्यात आली? न्यायालयाने राहुल गांधी यांना 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा सुनावली असती तर संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले नसते. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झाल्यानंतर त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube