Eknath Shinde : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुंब्र्यात एवढे फटाके वाजले की काहींना युटर्न घेऊन परत जावं लागलं, अशी टीका सीएम शिंदे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ठाण्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाहीत. नरेश आणि कार्यकर्त्यांनी इतके फटाके वाजवले की युटर्न घेऊन परत जावं लागलं. ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. जे पेरलं तेच उगवलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Eknath Shinde यांचे मुख्यमंत्रीपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते!, शरद पवार गटाचा दावा
शिवसेनेची शाखा जिथे होती तिथेच राहिल : उद्धव ठाकरे
डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात ठाण्यात आम्ही सभा घेणार आहोत. सत्तेच्या माजावर यांनी शाखा पाडली आणि आता घरं देखील पाडतील. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. आम्ही ठाण्यात आणि मुंब्र्यातही येऊन दाखवलं. सकाळी कुणीतरी ठाण्यात येण्याचं आव्हान दिलं होतं. आम्ही इथं आलो. गद्दारांना सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करत आहेत. आमच शाखा बुलडोझर लावून पाडली. पण आम्ही गप्प बसणार नाही. कारण ती आमची शाखा आहे. शिवसेना ही एकच आहे ती आमची आहे. त्यामुळं शिवसेनेची शाखा जिथे आहे तिथेच राहिल असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेऊन भिडा
‘पोलिसांचे धन्यवाद मानतो कारण, त्यांना शाखाचोरांचं रक्षण केलं. प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज इथं काही घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच राज्याची अब्रू घालवली आहे. दिल्लीच्या कृपेने आज तुम्ही सत्तेवर बसला आहात. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेऊन भिडा. आमची तयारी आहे. केसाला जरी धक्का लागला तर यांचे केस महाराष्ट्र उपटल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray : ‘आता ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील’ उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल