Download App

फडणवीस मास्टर ब्लास्टर! चौकार, षटकार मारतात अन् विकेटही.., मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

Cm Eknath Shinde Vs Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मस्टरमंत्री नाहीतर मास्टर ब्लास्टर, ते चौकार, षटकार अन् विकेटही घेत असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीस आता मस्टरमंत्रीच झाले असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज जेजुरीमधील आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अजितदादा तिहारच्या भितीनं गेले; शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काही लोकांचा राजकीय बोलल्याशिवाय दिवसचं जात नाही. त्यांना फडणवीसांना मस्टरमंत्री म्हणताना थोडसं काहीतरी वाटलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच कोणंतही काम आणलं तरी त्यांनी केलं आहे, याची तरी जाणीव ठेवायची होती, देवेंद्र फडणवीस मस्टरमंत्री नाहीतर मास्टर ब्लास्टर आहेत, ते चौकार, षटकारही मारतात आणि विकेटही घेत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Hariyana Violence : नूहमधील बुलडोझर कारवाईला ब्रेक! न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबईत काल संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. ते म्हणाले होते, भाजपकडे आता कोणताही राम उरलेला नाही, ते आयरामांची पूजा करीत आहेत. त्यावरुनही एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, तुम्ही आमच्यावर आयारामवरुन टीका करीत आहात, पण बाळासाहेबांचे विचार सोडून गेले ते गयाराम असं आम्ही म्हणायचं का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

तसेच आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकारामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलेल्या योजना बंद केल्या होत्या पण आता आम्ही त्या योजना पुन्हा सुरु केल्या आहेत. राज्यकर्त्याचं काम योजना बंद पाडणं नसतं. शेतकरी सर्वसामान्यांना सुविधा कशा मिळतील? हे राज्यकर्त्यांचं काम असतं. आमच्या दिल्ली दौऱ्यावरुनही टीका केली जाते. दिल्लीला आम्ही राज्याच्या विकासासाठी जात आहोत. मोठ्या प्रकल्पासाठी केंद्राचं पाठबळ लागतं त्यासाठी आम्ही दिल्ली जातो. तुम्ही कितीही टीका केली तरीही आम्ही दिल्ली जाऊच, आम्ही कोणतीही नोटीस आली म्हणून आम्ही गेलो नसल्याची टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

Tags

follow us