अजितदादा तिहारच्या भितीनं गेले; शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar On Ajit Pawar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. सोलापूरमध्ये आज प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय? सिनीअर माणूस आहे, वयोवृद्ध नेते म्हणून आपण न बोललेलं बरं असं म्हणत अजित पवारांबद्दल, जर ते सरकारमध्ये सहभागी झाले नसते तर तिहार जेलमध्ये असते, असेही यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.(Prakash Ambedkar criticize On Ajit Pawar Tihar Jail sharad pawar ncp solapur state government )
ज्यांचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज.., ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी…
प्रकाश आंबेडकर आज सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. या सरकारला मार्केटिंगच्या पुढे काहीच दिसत नसल्याचीही टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Ahmednagar News : शिवरायांचा अपमान! ठाकरे गट आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा..,
पत्रकारांनी शरद पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, शरद पवार सिनीअर माणूस आहे, वयोवृद्ध नेते आहेत, पण आता त्यांच्याकडं काय उरलं आहे? त्याचबरोबर अजित पवारांना तिहारमध्ये जायचे नव्हते त्यामुळे ते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
शालिनीताई पाटील यांनी अजितदादावर केलेल्या आरोपांचं खंडन त्यांनी अद्याप केलेलं नाही. हे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे. त्याचवेळी 2024 मध्येही अजित पवारांना तिहार जेलमध्ये जायचे नसेल तर भाजपबरोबर राहणं भाग आहे, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अमित शाह यशस्वी का होतात? याचं उत्तर शालिनीताई पाटील यांनी दिलेलं आहे, असेही यावेळी आंबेडकर म्हणाले.