Ahmednagar News : शिवरायांचा अपमान! ठाकरे गट आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा..,

Ahmednagar News : शिवरायांचा अपमान! ठाकरे गट आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा..,

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नगर शहरातील मुकुंदनगर येथील एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे. दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. ठाकरे गटाकडून या घटनांच्या निषेध करण्यासाठी आज शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. तसेच शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

नानासाहेब पेशव्यांना 8 ते 10 वर्षाच्या मुली लागायच्या; भालचंद्र नेमाडेंचे विधान

यावेळी शिवसेनेच्यावतीने नगर शहरातील इंपिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यांनतर शिवसैनिकांनी शहराच्या विविध भागातून मोटारसायकल रॅली काढली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.

नानासाहेब पेशव्यांना 8 ते 10 वर्षाच्या मुली लागायच्या; भालचंद्र नेमाडेंचे विधान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं, नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात अशांतता माजविण्याचा डाव केला जात असून, आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही नेते मंडळी विशिष्ट समाजाला हाताशी धरून असे उद्योग करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांना महापुरुषांबद्दल अपशब्द वापरायला सांगून जातीय तेढ निर्माण करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

तसेच शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून समाजा-समाजात तेढ निर्माण करुन वातावरण दुषित करत आहेत. अशा घटनांचे पडसाद राज्यभर उमटत असल्याने अशा प्रवृत्तीला वेळेच ठेचले पाहिजे. नगरमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही, तरी शासनाने अशा व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, जेणे करून पुन्हा अशा घटना घडणार नाही. अन्यथा आम्हालाच अशा लोकांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube