ज्यांचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज.., ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी…
ज्याचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज आम्ही केलायं, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केली आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. जेजुरीमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली.
Ahmednagar News : शिवरायांचा अपमान! ठाकरे गट आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा..,
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधक सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेवर टीका करीत आहेत. त्यांना एवढंच सांगतो, उघडा डोळे आणि बघा नीट हे चित्र. हे चित्र पाहून ज्यांच्या पोटात दुखतं असेल त्यांचाही इलाज आम्ही केला असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. तसेच ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ जनेतसाठी तर आहेच पण पोटात दुखणाऱ्यांसाठीही असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
आम्ही दोघेही एकच, दोन गट असल्याचा पुरावा नाही; शरद पवार गटाचे EC ला उत्तर
तसेच शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या 7 ते 8 कोटी नागरिकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे आम्ही फक्त आश्वासने देत नाहीतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आम्ही अंहकार बाजूला ठेऊन काम करतोयं, केंद्राकडून निधीची मदत घेतो, पण पूर्वी कडकसिंग सरकार होतं ते म्हणत होतं की मागायचं कशाला? असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
राज्यातलं शक्तीपीठ असलेलं देवस्थान जेजूरीसाठी 359 कोटींची निधी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा देण्याचं काम सरकार करतं आहे. जेजूरी आपलं एकच शक्तीपीठ आहे. राज्यात अनेक शक्तीपीठ आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं काम करतंय असून जनतेच्या सहकार्याने ‘शासन आपल्या दारी योजना’ कल्याणकारी हा लोकाभिमुख कार्यक्रम होत आहे.