Download App

Eknath Shinde : ‘पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही…’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde on Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा धुव्वा उडाला आहे. 45 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. एनडीएला फक्त 19 तर भाजपला 9 जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली.

राज्यातील घडामोडींना वेग…महायुती फुटीच्या उंबरठ्यावर 

आज माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, एका निवडणुकीतील पराभवामुळं सर्व काही संपत नाही. पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही, एका निवडणुकीत सर्वकाही संपत नसते. एका निवडणुकीत हार-जीचl झाल्यामुळं आम्ही खचून जाणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील. पण आम्ही एक टीम म्हणून एकत्र काम करू, असं शिंदे म्हणाले.

‘पिपाणी’ने तुतारीचे मते फुकटात घेतले पण ! लंके, मोहिते, सोनवणेंना घाम फोडला ! 

शिंदे म्हणाले, निवडणुकीमध्ये जय-पराजय होतच असतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्यात. मात्र मतदानाची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांची टक्केवारी सारखीच आहे. मुंबईत आम्हाला २ लाखांहून अधिक मते मिळाली. हे यशापयश सर्वांचे आहे. त्याची जबाबदारी आम्हा सर्वांचीच आहे, असं शिंदे म्हणाले.

पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील विरोधकांनी राज्यघटना बदलण्याचे नरेटीव्ह तयाय रेले. ‘खोटे पण रेटून बोला’ या उद्देशाने प्रचार केला. विरोधकांनी जनतेची दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न केला. मोदींकडे विकासाचा अजेंडा आहे.

फडणवीसांनी पळून जाऊ नये – वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आछहेत. जिगरबाज आहेत. त्यांनी पळून जाऊ नये, त्यांनी भाजपला राज्यात 22 वरून 9 जागांवर नेले, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले फडणवीस?

पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस सर्व जबाबदारी स्वीकारत आहेत. आता मला विधानसभेसाठी पूर्णपणे उतरायचं आहे. मला सरकारमधून मुक्त करा, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज