Download App

पंतप्रधान मोदींचा सामना करणं येड्या गबाळ्यांचं काम नाही, आठवलेंचा ठाकरेंना टोला

मुंबई : आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना केला. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (ramdas athawale)प्रतिक्रिया दिलीय. आठवले म्हणाले की, संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनी प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांचा सामना करणं हे काय येड्या गबाळ्यांचं काम नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.

आठवले म्हणाले की, आपल्या देशात पंधरा-वीस पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनीही प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणं हे काय येड्या गबाळ्यांचं काम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024 चे पंतप्रधान राहणार आहेत, त्याबद्दल आम्हाला चिंता अजिबात नाही, आम्ही देशाचा विकास केलाय, लोकांचे प्रश्न सोडवलेत.

Nitin Gadkari : कसबा निवडणुकीनंतर नितीन गडकरींच्या नावाने ‘तो’ मेसेज करणारा निघाला ठाकरे गटाचा कार्यकर्ता

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत. त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद त्यांना संभाळता आलं नाही, त्यामुळं कोणीही उठून पंतप्रधान पदाची भाषा वापरणं योग्य नाही, अशी जोरदार टीका सामदास आठवलेंनी ठाकरे गटावर केलीय.

सरकारविरोधात बोलाल तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यावर आठवले म्हणाले की, सरकार विरोधात चोर, गद्दार अशी भाषा वापरली जातेय, आम्ही कोणाचं तोंड बंद केलं नाही. जीवाचं संरक्षण करणारं आमचं सरकार आहे. त्यामुळं अशोक चव्हाण जे बोलताय ते योग्य नसल्याचंही यावेळी आठवलेंनी म्हंटलंय.

कसब्याच्या निवडणुकीवरून हवा बदलली असं अजिबात म्हणता येणार नाही. काँग्रेसला तिथं विजय मिळालाय. मात्र, त्या ठिकाणी फक्त 11 हजार मतांचा फरक आहे. त्याठिकाणी आम्ही आत्मपरीक्षण करतो आहोत. एक सीट आली म्हणून हरवून जाता कामा नये. त्यामुळं हवामान बदलतंय या शरद पवारांच्या मताशी मी सहमत नाही, असंही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय.

Tags

follow us