Congress MK Stalin Meeting: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून विरोधकांमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय द्रमुकने घेतल्यानंतर काँग्रेसने आता हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांचे शिष्टमंडळ रविवारी चेन्नईत दाखल झाले आहे. या नेत्यांकडून द्रमुकचे (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन विधेयकाला विरोध करण्याची विनंती केली जाणार आहे. मात्र, काँग्रेसच्या या शेवटच्या क्षणी सुरू झालेल्या प्रयत्नांवर द्रमुकमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आता या भेटीला खूप उशीर झाला आहे. शेवटच्या क्षणी भेट घेऊन काय उपयोग?’ त्यामुळे आताची ही भेट फक्त फोटो काढण्यापुरती आहे. , अशी नाराजी द्रमुकच्या नेत्यांकडून उपस्थित केली जात आहे.
द्रमुक नेत्यांचा काँग्रेसवर सवाल, ‘आता भेट घेऊन काय उपयोग?’
डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने यापूर्वीच द्रमुकशी संपर्क साधायला हवा होता. मात्र, विधेयक संसदेत मांडण्याची वेळ आल्यानंतर काँग्रेसला जाग आली आहे. द्रमुकने केंद्र सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता शेवटच्या क्षणी भेट घेऊन काय साध्य होणार? असा सवाल पक्षातील काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या आणि द्रमुकच्या या भेटीत प्रत्यक्षात काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
