Congress faces hurdle in Latur Amit Deshmukh shocked by colleague Gojamgunde entry into NCP : सध्या राज्यामध्ये नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान दुसरीकडे राज्यातील सर्वच पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यामध्येच आता लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. ज्यामुळे अमित देशमुख यांना मोठा धक्का बसला असून काँग्रेसला खिंडार पडलं आहे. कारण देशमुख यांच्या जवळच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
कुणाला अर्थिक लाभ तर कुणाला प्रवासाचे योग; जाणून घ्या मेषपासून मीनपर्यंत आजचा दिवस कसा राहणार?
लातूरचे माजी महापौर आणि काँग्रेसची सक्रिय युवा नेते म्हणून ओळखले जाणारे विक्रांत गोजमगुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला गुंडे हे 2019 2022 या काळात लातूर महानगरपालिकेचे महापौर होते. तसेच ते काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गोजमगुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अमित देशमुख यांना राजकीय धक्का असल्याचे मानले जात आहे.
राम शिंदे अन् रोहित पवारांचा संघर्ष पेटणार, कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई
दरम्यान गोजम गोजमगुंडे हे जरी देशमुख यांचे जवळचे सहकारी असले, तरी देखील विधानसभा निवडणुकीपासून ते देशमुखांवर नाराज आहेत. कारण पक्षाने विधानसभेवेळी लातूर शहराऐवजी त्यांना अहमदपूरला पाठवले. लातूरमधील आपलं राजकीय वजन यातून कमी झालं. त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक लातूर पासून दूर केले जात असल्याचा समज त्यांचा आहे. यातूनच त्यांची ही नाराजी आणि पक्षप्रवेश घडून आल्याच बोललं जात आहे. मात्र त्यांच्या जाण्यामुळे लातूर महानगरपालिकेत काँग्रेसला याची चांगली किंमत मोजावी लागणार एवढं नक्की.
