Sujay Vikhe On Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रयागराज घटनेवरती बोलावं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर देत घडलेला दुर्दैवी घटनेवर राजकारण करण्याची काँग्रेसची (Congress) सवय आहे असा टोला लावला आहे.
माध्यमांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले की, हिंदूंचा आणि प्रयागराज घटनेचा तसा काही संबंध नाही. हिंदू जागा झालाय हेच तुम्हाला प्रयागराजमध्ये पाहायला मिळत आहे. आजपर्यंत कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी कधीच होत नव्हती फार अति गर्दी झाल्याकारणाने प्रशासन एका विशिष्ट प्रमाणामध्ये नियोजन करते परंतु गर्दी जास्त झाल्याने कुणी असलं तरी ते नियोजन कोलमडते आणि ती घडलेली घटना ही दुर्दैवी आहे.
घडलेल्या दुर्दैवी घटनेवर राजकारण करण्याची प्रथा काँग्रेसची आहे आणि त्या धोरणांचा विरोध करून काँग्रेसला जर असं वाटत असेल आपण असं बोलल्यानंतर हिंदूंचे मत मिळायला सुरू होतील हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. असं माजी खासदार सुजय विखे म्हणाले.
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य हे संगमनेरच्या मतदारांचा अपमान : सुजय विखे
विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर मतदारसंघांमध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव झाला असून त्यांच्या पराभवावर काल मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संशय व्यक्त केला होता. त्यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, राज ठाकरे हे कधी संगमनेरला आलेले नाहीत. माझी त्यांना विनंती आहे की संगमनेर दौरा करावा त्यांनी केलेलं वक्तव्य हे संगमनेरच्या मतदारांचा अपमान आहे.
राज ठाकरे संगमनेरमध्ये आले तर त्यांच्या लक्षात येईल की आमची अपेक्षा चाळीस-पन्नास हजाराची होती परंतु आम्ही 10 हजारापर्यंतच येऊ शकलो. संगमनेरची वास्तविकता ते ज्या दिवशी पाहतील त्या दिवशी ते त्यांचं वक्तव्य मागे घेतील अशी टीका सुजय विखे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
Jayakumar Rawal : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ
तसेच पुढे देखील निवडणुका आहे. जर विधानसभेचा अपवाद असेल तर यापुढे वर्षभरात निवडणुका होणार आहे. थोरात साहेबांनी त्या परिणामांच्या अगोदरच त्यांनी सांगावं की मी येथून इथून पराभूत झालो तर असं पुन्हा बोलणार नाही. असं थोरात साहेबांनी मीडियासमोर मांडलं तर आम्ही पुढच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढून सिद्ध करून दाखवेन की हा अपवाद नसून जनतेने आता तुम्हाला नाकारले आहे. असेही माजी खासदार सुजय विखे म्हणाले.