Download App

Kasaba by poll : कसब्यात काँग्रेसने ताकद लावली, तब्बल वीस तगडे प्रचारक रिंगणात

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (kasba) आणि चिंचवडमधील (chinchwad) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तब्बल वीस तगडे प्रचारक रिंगणात उतरवले आहेत.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून 26 फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने वीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Web Series : एकता कपूरने दिला Alt Balaji चा राजीनामा, ‘हे’ आहे कारण

या स्टार प्रचारकांमध्ये महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुनिल केदार, आ. यशोमती ठाकूर, खासदार कुमार केतकर अशी ज्येष्ठ नेत्यांची फौज प्रचारात उतरणार आहे.

हेही वाचा : Nitin Gadakari : देशातील सर्वाधिक लांबीच्या मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वे चे हे फोटो पहा

सोबतीला तरुण नेत्यांची फौज देण्यात आली आहे. यामध्ये आ. प्रणिती शिंदे, आ. अमित देशमुख, आ. सतेज पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खा. इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे. काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील, काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आले आहे.

Tags

follow us