जनताच त्यांची मस्ती जिरवेल… जिल्हा बँक निवडणुकीवरून रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rohit Pawar on Ram Shinde यांनी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी जोर लावला असून यावरती रोहित पवार यांनी भाष्य केले

Ram Shinde Rohit Pawar

Rohit Pawar on Ram Shinde for Ahilyanagar District cooparative bank election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक ही येणाऱ्या काळात पार पडणार आहे. त्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी देखील निवडणुकीसाठी जोर लावला असून यावरती रोहित पवार यांनी भाष्य केले ते म्हणाले मतदार संघात त्यांच्याकडे पद असून त्यांना काही एक काम करता आले नाही. निवडणुकीचा विषय आला की ते फिरू लागतात. मात्र त्यांना उभे राहता येणार नाही आपल्याकडे एवढे मोठे पद असून आपण त्या पदाचा वापर जनतेसाठी करावा असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, न्याय नक्कीच मिळणार… तांबेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले सारखं सारखं स्वतःलाच सगळं काही भेटले पाहिजे यासाठी ते फिरतायत. निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवण्यासाठी ते फिरतायत मात्र जनतेला हे समजलं आहे. त्यांची जिरवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. अशा शब्दांत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या वतीने जोरदार निशाणा साधला.

तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाआधी सरकारचा मोठा निर्णय, रविवारीही बँका राहणार खुल्या

जेव्हा कांद्याला भाव मिळत नव्हता तेव्हा हे निवांत मस्ती करत होते, हेलिकॉप्टरने फिरत होते, तसेच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक कर्जमाफीची घोषणा झाली. तेव्हा आम्ही आंदोलनाला बसलो त्यावेळेस आमची चेष्टा मस्करी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर शेतकऱ्यांबाबत त्यांनी जगाचा काठी टाकल्या होत्या. त्या देखील मागे घेतल्या यावरूनच तुमचं वजन काय हे समजतं तुम्हाला महत्व का दिला जातं तर तुम्ही केवळ कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरोधात लढतात त्यामुळे तुम्हाला ताकद दिली आहे.

सरकारी दरात वाढ कायम असताना उत्तर प्रदेशातील काही भागांत एजन्सींकडून कमी किमतीत विक्री

मात्र आम्हाला सर्वसामान्य लोकांनी ताकद दिली आहे म्हणून आम्ही त्यांचे प्रश्न मांडू शकतो.तुम्हाला रोहित पवारांना थांबवण्यासाठी पद दिला आहे मात्र किती दिवस ते पद घेऊन मिरवणार आहे मात्र त्या पदापेक्षा सर्वसामान्यांसाठी सामान्य लोकां साठी त्यांनी काम केलं पाहिजे असं आमचं मत आहे असे शब्दात आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला.

follow us