Download App

फडणवीसांच्या A, B, C प्लानवर अशोक चव्हाणांचं काय आहे? ‘प्लान R’, वाचा सविस्तर

मुंबई : ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमामध्ये बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीचे व्हिजन मांडले आहे. अनेक राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भात परत एकदा अशोक चव्हाणांनी आपली बाजू स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्या ‘प्लान सी’बाबत विचारलं होतं. त्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी ‘प्लान आर’नं उत्तर देण्यात आली आहे.

माझं  आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध असतील, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे, देवेंद्र फडणवीसांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रत्येकांची भूमिका ही वेगळी आहे. पण आपसांत काय आम्ही नेहमी भांडत राहावं ? ही अपेक्षा मात्र चुकीची असल्याचे, अशोक चव्हाणांनी सांगितले आहे. विकास एक निरंतर राजकीय प्रक्रिया आहे, या मताचा मी आहे. पण तो किती गतीने व्हावा, मग ते राज्य कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचे असो आणि कोणीही राज्यकर्ता असो. पण महाराष्ट्र हा देशात अग्रेसर राहिला पाहिजे, हिच माझी प्रामाणिक भूमिका असणार आहे, आणि त्या भूमिकेतून या कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी झालो आहोत.

महाराष्ट्राचा सुवर्णकाळ आपण सर्वांनी पाहिला आहे. मी लहानपणापासून ही सर्व प्रक्रिया अगदी जवळून पाहत आलो आहे. स्वर्गीय वसंतराव नाईकांपासून ते विलासराव देशमुखांपर्यंत जो कार्यकाळ आहे, तो संपूर्ण मी पाहिला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर मी काम केलं आहे. यासर्व राजकीय चढ उतारांमध्ये राज्यात जे काही घडले आहे, तेही मी अनुभवले आहे. यामुळे राजकीय भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्र हा सदैव समोर राहिला पाहिजे. एक म्हण असायची की, हिमालयाचत मदतीला जर कोणी गेलं असेल, तर तो महाराष्ट्र गेलाय, असे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे योगदान 15 टक्क्यांपर्यंत आहे. थेट परकीय गुंतवणुकीत 31.4 टक्के योगदान राज्याचे आहे. तर महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे 2 लाख 84 हजार रुपये इतके असणार आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे. यामुळे विकास हा समतोल झाला पाहिजे, असं मला वाटतं आहे. प्रत्येक राज्यासमोरचा ज्वलंत प्रश्न म्हणजे, बेरोजगारी आहे. 2020 ते 2021 मधील आकडेवारीनुसार, शहरी भागांत 6.5 टक्के आणि राज्याच्या ग्रामीण भागांत 2.2 टक्के असणार आहे. यामुळे आपले संपूर्ण लक्ष हाच असला पाहिजे. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही हेच लक्ष्य ठेवलं होतं. तसेच लक्ष्य विद्यमान सरकारच्या काळात राहणार असल्याची अपेक्षा निश्चितच करावी लागणार आहे, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंनंतर मराठवाड्याचा महाराष्ट्रात आणि देशातला आवाज म्हणजे अशोक चव्हाण असायचे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा दुर्मिळ योग चव्हाण कुटुंबाला अनुभवायला मिळाला होता. अत्यंत कठीण काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाणांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे मोठे जाळे तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न शिवसेनेतील काही राजकीय भूकंपाने अपुरा राहिला आहे. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस क्षीण झाली आहे.

महागाई, बेरोजगारी, मंदीचं सावट, उद्योगांची उपेक्षा या अशा संकटामधून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी त्यांचं आणि पक्षाचं नेमकं काय व्हिजन असणार आहे? नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून गेली आहे, त्याचा पक्षामधील नेत्यांना जोडण्यासाठी काय फायदा होणार आहे? काँग्रेसमध्ये कायम टप्पा पडणार आहे, अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे. त्यामागचं वास्तव काय असणार आहे? आणि 2024 करिता पक्षाचा आणि अशोक चव्हाण यांचा रोडमॅप कसा असणार आहे? यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ कार्यक्रमात आपली मत मांडले आहे.

महाराष्ट्रात सध्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असे असले तरी मागील काही महिन्यात राज्याने बघितले आहे, अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या ]गाडा अद्याप थंडावलेला नाही. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांना करावा लागणार आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यात सद्यस्थितीविषयी काय वाटत आहे, अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी ठरणार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असणार आहे?

Tags

follow us