Harshavardhan Sapkal Criticized PM Modi and RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2025) लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. आपल्या भाषणात मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्याचा गौरव केला आहे. आरएसएस जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. संघाच्या 100 वर्षांच्या सेवाकार्याचा देशाला गर्व आहे असे उद्गार पीएम मोदी (PM Modi) यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आज पंतप्रधानांनी जे सांगितलं ते खोटं आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांनी केला आहे.
सपकाळ पुढे म्हणाले, प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान जे बोलत त्या प्रमाणे वागत होते पण त्याला मागील 11 वर्षात याला बगल देऊन फक्त खोटे बोलले जात आहे. संघाबद्दल पंतप्रधान आज जे बोलले तेही खोटेच बोलले.
टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश पदाधिकारी व काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वांतत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, भारताची फाळणी ही एक दुःखद घटना आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल होते म्हणून देश एकसंध राहिला नाहीतर 600 देश झाले असते.
देशातील युवकांसाठी PM मोदींची मोठी घोषणा; आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत योजना लागू
फाळणीचे दुःख आहेच पण भाजप सरकार 13 ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून फाळणीचा दिवस साजरा करण्याचा फतवा काढते हा काय प्रकार आहे. 1942 चे चले जाव आंदोलन सुरू होते तेव्हा रा. स्व. संघ, सावरकर कोठे होते? हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणी मोठी किंमत मोजली हे सर्वांना माहित आहे. देशात आज बेशिस्त वाढली आहे आणि ती काँग्रेसच दूर करु शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांचे आपण पाईक आहोत, त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत, असेही सपकाळ म्हणाले.
तरुणांना 15 हजार रुपये देण्याच्या पंतप्रधानांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू यांसारख्या घोषणा यांनीच दिल्या होत्या. पण त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ही घोषणा सुद्धा फसवीच ठरेल असेही सपकाळ म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदीबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वन नेशन वन इलेक्शन एवढ्यापुरतेच हे मार्यादित नाही तर वन नेशव वन लिडर, एकच पेहराव, एकच भाषा, एकच टिव्ही चॅनल व एकच व्यंजन ही संकल्पना भाजपाला राबवायची आहे. हा हास्यास्पद प्रकार आहे.
‘कबूतर जिहाद’ भाजपचेच पाप, सरकारने अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभारावा; सपकाळांचा हल्लाबोल