Nana Patole News : भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव सुरु असल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून काल अंतिरम अंर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अनेक मोठ-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावर बोलताना नाना पटोलेंनी टीका केली आहे.
भाजप नेते बंडखोर का होत नाहीत? ‘पॉलिटिक्स’ संपण्याची भीती की आणखी काही…
नाना पटोले म्हणाले, राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थसंकल्पात एक लाख वित्तीय तूट पाहण्यात आलीयं. कर्ज घेऊन चालवण्याची जी पद्धत आहे ती राज्याला डुबवणारी आहे. राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करुन जनतेला झोपवण्याचा प्रकार सुरु असून अजूनही कर्ज घेण्याची बाकी असल्याचं ते म्हणतात. आता सरकारचा खरा चेहरा निवडणुकीत जनतेसमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
अजितदादांकडून मोठ्या घोषणा! जाणून घ्या एका क्लिकवर अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये…
तसेच जीएसटमधून जो पैसा लुटला जातोयं तरीही संपत्ती विकून देश चालवण्याचा काम केलं जातं आहे. देश आणि राज्य संपुष्टात आणायंच अशी मानसिकता भाजपची याचा आम्ही निषेध करतो. भाजपकडून देशाचा राज्याचा लिलाव करण्याच काम सुरु असून याचा आता विरोध होत आहे कालच्या अर्थसंकल्पानंतर स्पष्ट झाल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे.
दरम्यान, राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.