Download App

पवारांच्या टीकेनंतर नाना पटोले धावले पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीसाठी

Nana Patole On Prithviraj Chavan :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर तोंडसुख घेतले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीला भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला होता. त्यावर पवारांनी चव्हाणांना चांगलेच सुनावले आहे. यावर आता नाना पटोले यांनी भाष्य करत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांची पाठराखण केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपाच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी चव्हाणांची  बाजू घेतली आहे.

वाद चिघळला! गेहलोतांना घेरण्यासाठी पायलट काढणार जनसंघर्ष यात्रा, प्लॅनिंग काय ?

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात आम्ही लुडबुड करण्याचा प्रश्न नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. कोणाच्या पक्षात काय चालले आहे हे पहाणे आमचे काम नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

कांताबाई अंधारे कसदार जमीन अन् मी दमदार पीक, सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांनी कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीला भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला होता. त्यावरुन पवारांनी चव्हाणांना चांगलेच सुनावले होते. चव्हाणांची पक्षात काय जागा आहे, ते आधी तपासावं, असा टोला पवार यांनी आज लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षात काय स्थान आहे. ते  आहेत, की बी आहेत, की सी आहेत, की डी आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, अशा शब्दात पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा समाचार घेतला.

 

 

Tags

follow us