मुंबईः पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना अडचणीत आणले आहे. येरवडा येथील पोलिस खात्याची जमीन विक्री करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दबाव आणल्याचा आरोप बोरवणकर यांचा आहे. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, असा मुद्दा आता समोर येऊ लागला होता. येरवडा जमिनीच्या प्रकरणाच्या वेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. मी नोव्हेंबर 2010 मध्ये मुख्यमंत्री झालो. पण बोरवणकर यांनी प्रशासकीय बदलीसाठी विनंती केली होती. जवळपास पुण्यातच त्यांना पोस्टिंग हवी होती, हे मात्र खरे असल्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithiraj Chavan) यांनी म्हटले आहे.
भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेले; आता भाजप-ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपली
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बोरवणकर यांचे पुस्तक मी वाचलेले नाही. केवळ माध्यमांतून बातम्या बघितल्या आहेत. याबाबत माहिती घेतल्यानंतर पुढे बोलणे उचित राहिल. परंतु नियमबाह्य काही झाले असेल तर चौकशी व्हावी. येरवडा येथील पोलिस खात्याची जमिन विक्री व बोरवणकर यांची बदली हे दोन वेगळे विषय आहेत. त्यांच्या बदलीबाबत चर्चा झाली होती. प्रशासकीय कारणासाठी पुण्यातच पोस्टिंग हवी होती. परंतु त्यावेळेच त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. असे आश्वासने देता येत नाही.
Gopichand Padalkar : साहेब,ताई अन् दादा, एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा; पडळकरांचा पुन्हा पवारांवर निशाणा
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत प्रक्रिया मंडळ असते. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यामध्ये बदलीबाबत चर्चा झाली होती. त्यावेळेस आघाडीचे सरकार असल्याने गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना विचारले असावे, असेही च्हाण यांनी म्हटले आहे.
मीरा बोरवणकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. 2010 मध्ये येरवडा कारागृहाजवळील पोलीस दलाची तीन एकर जमीन बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांनी आग्रह धरला होता. मात्र आपण त्यास साफ नकार दिला, असा मोठा आरोप बोरवणकर यांनी केला आहे. त्यांनी पुस्तकात थेट अजित पवार यांचे नाव घेतलेले नाही. फक्त दादा व्यक्ती असे म्हटले आहे. त्यावर आता विरोधक अजित पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनीही या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.