Download App

महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन कमळ, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

Prithviraj Chavan on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे तर महाविकास आघाडीत देखील वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांनी महाविकास आघाडीत आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा दावा केलाय. ‘राज्यात लवकरच ऑपरेशन कमळ होऊ शकतं’ असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट काय?
लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले की, पक्ष सदस्याच्या राजीनामा देऊन पक्षांतर करणे कुठलीही कायदेशीर बंदी नाही. परंतु दोन तृतीयांश लोकांनी आपला वेगळा गट निर्माण करणं आपले सदस्त्व वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात शामील होणे. त्याची मला शक्यता वाटत नाही. आता व्यक्तिगत कारणाने आमदारांनी राजीनामा दिला आणि पक्षांतर केले तर काही आश्चर्य वाटायची गरज नाही. त्यामुळे फार मोठे गणित बदलेलं असं वाटतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवारांच्या गटाच्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, भारतीय कुस्ती महासंघाचा निर्णय

पुढे ते म्हणाले की, आता तरी सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या सोळा आमदारांना निलंबित केले तर त्यांना मंत्री होता येणार नाही. कायद्यानुसार तर अशा परिस्थितीत देखील देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट यांचेच बहुमत असेल. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बदलावा लागेल. पण आणखी संख्या वाढवण्यासाठी कदाचित ऑपरेशन कमळचा वापर करण्यात येऊ शकतो. त्यामध्ये काही आश्चर्य वाटायला नको, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

काही लोक ज्यांची मजबुरी असेल तर ती लोक जाऊ शकतात. परंतु कोण जाईल, कोणाची मजबुरी, कोणावर ईडीचे खटले आहेत. त्यावर बोलताना येणार नाही. माझ्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय मोठा टर्निंग पॉईंट ठरेल असे मला वाटतं, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Tags

follow us