प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Priyanka Gandhi Roadshow in Gadchiroli On 13 November : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय दौरे, सभा, प्रचार याला उधाण आलंय. गडचिरोलीत देखील कॉंग्रेस (Priyanka Gandhi) कंबर कसून कामाला लागलेलं दिसतंय. गडचिरोलीमधील आदिवासी मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. आता कॉंग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीच्या शिलेदारांसाठी पक्षातील दिग्गज मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय.
काँग्रेस पक्षाच्या सहसचिव प्रियांका गांधी गडचिरोलीत प्रचार करणार आहे. येत्या 13 नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी याची भव्य सभा आणि रोड शो होणार आहे. काँग्रेसचे गडचिरोलीचे उमेदवार मनोहर पोरोटी आणि आरमोरीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारसाठी रोड शो होणार आहे. इतकंच नव्हे तर गडचिरोली शहरात देखील भव्य रोड शो होणार आहे.
Puja Khedkar Case: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?
कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी वाड्रा 11 नोव्हेंबर रोजी केरळमधील वायनाड येथे लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचार करणार आहेत. दोन्ही राज्यांतील निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्या सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचार 18 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याच वेळी, झारखंडच्या सर्व 81 विधानसभा जागांसाठी 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचार 11 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबरला संपणार आहे.
“ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो”, भुजबळांचा खुलासा, ‘त्या’ पुस्तकातील दावा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केलीय. विशेष म्हणजे प्रियांका गांधी पोटनिवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करत असून 18 नोव्हेंबरला प्रचार संपण्यापूर्वी जास्तीत जास्त क्षेत्र कव्हर करण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होत आहे. कोण सत्ता स्थापन करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.