Download App

‘महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही’; राहुल गांधींचा पवार-ठाकरेंना टोला

Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर (INDIA Meeting) मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांवरही मोजक्या शब्दांत भाष्य केले. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएन मिळेल. महाराष्ट्रात आज कोणता पक्ष उभा आहे? आमच्यात दम नाही म्हणता तर मग कर्नाटकात भाजपाचा सफाया कुणी केला?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

INDIA Alliance : आमची एकजूट पाहून विरोधकांमध्ये घबराट वाढलीय; ठाकरेंचा भाजपवर निशाणा

राहुल गांधी पुढे म्हणाले, आम्ही हिंसा, द्वेषाने काम करत नाही तर आम्ही शत्रुच्या प्रदेशात जाऊन तेथे प्रेमाचं दुकान उघडतो. आता त्यांच्या घरात जाऊन प्रेमाचे दुकान सुरू करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी तयार राहा. मुंबई आणि महाराष्ट्र माझ्या आवडीची ठिकाणं आहेत. प्रत्येक संघटनेत काही नाराजी असते. उणीदुणीही असतात पण, मुंबई हे काँग्रेसचे महत्वाचे केंद्र राहिले आहे. आताही महाराष्ट्रात कोणती पार्टी उभी आहे असे स्पष्ट करत कार्यकर्ते हीच काँग्रेसची ताकद आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

आपल्या शरीरातील रक्त काढले तरी डीएनए एकच असेल. तो कुणाला भीत नाही. हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसमध्ये सिंह आहेत आणि हा बब्बर सिंहांचा पक्ष आहे. या पक्षात सिंहीणी सुद्धा आहेत. भाजप, मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काँग्रेसची भीती वाटते. महाराष्ट्रात यांचा सफाया होणार आहे. इंडिया आघाडीच भाजपाचा पराभव करणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. मोदी सत्तेत आले तेव्हा काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. मात्र जे ब्रिटिशांना जमलं नाही ते यांना कसं जमेल. अदानी आमचं काहीच करू शकत नाही. अदानीचा पैसा काँग्रेसला संपवू शकणार नाही, असे आव्हान गांधी (Rahul Gandhi) यांनी दिले.

‘जे इंग्रजांना जमलं नाही, तिथं मोदी काय करणार?’ राहुल गांधींचा हल्लाबोल!

राहुल गांधींचा पवार-ठाकरेंना टोला

दरम्यान, राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यातून जो संदेश जायचा होता तो गेलाच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आगामी जागावाटपात त्याचा परिणाम दिसणार आहेच. तसेच विरोधी पक्षातील नेते काँग्रेस फुटणार असे सातत्याने सांगत असतानाही अजूनही काँग्रेस पक्ष अभेद्य आहे. महाराष्ट्रात सध्या कोणती पार्टी उभी आहे, असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी हे निदर्शनासही आणून दिले.

Tags

follow us