Download App

‘मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी, माणुसकीच्या नावावर कलंक’, तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वडेट्टीवार भडकले

Congress Leader Vijay Wadettiwar Criticize Mangeshakar Family : पुण्यात गर्भवती महिला तनिषा भिसे (Tanisha Bhise Case) मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. तिचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Hospital) हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप केला जातोय. याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी मंगेशकर कुटुंबावर आरोपांची तोफ डागली. मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय योगदान दिलं? कला क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं, पण समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून नाही आलेली”, असं देखील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हटले आहेत.

सरकारने अशा प्रकरणांवर लक्ष देऊन, गरिबांचे शोषण करणाऱ्या कोणत्याही घटकावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी देखील मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी आहे. दान केल्याचं कधी कुणी पाहिलं का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून उदो उदो केला. त्यांचा समाजासाठी प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून आलेली नाही, असा देखील घणाघात वडेट्टीवार (Congress) यांनी केलाय.

मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

खिलारे पाटलांनी दवाखान्यासाठी जमीन दिली. त्यांना देखील सोडलं नाही. माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब. तसेच गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये, कडक कारवाई झालीच पाहिजे ही मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केलीय.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने रुग्णालयावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी मृताच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयावर आरोप केले होते. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, 10 लाख रुपये घेऊनही रुग्णालय प्रशासनाने महिलेला उपचारासाठी दाखल केले नाही आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

मणिपुरात पु्न्हा हिंसाचार, कर्फ्यू लागू, शाळा अन् बाजार बंद; वादाचं कारणही धक्कादायक

याप्रकरणी राज्य सरकारच्या समितीच्या अहवालात असेही म्हटलंय की, रुग्णालयाने गर्भवती महिला साडेपाच तास तिथे राहिली परंतु ती कोणतीही माहिती न देता निघून गेली. समितीने म्हटलंय की, रुग्णालयाने रुग्णाला ‘गोल्डन अवर्स’ उपचार देण्याचा नियम पाळला नाही. या प्रकरणात पुढील कारवाईसाठी धर्मादाय आयुक्तांना शिफारस करण्यात आली आहे.

 

follow us