Vijay Wadettiwar Demand Dhananjay Munde Resignation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल. नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. यासाठी मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घ्यावा लागेल. तरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्याला अर्थ राहील, बीड जिल्ह्यातील जनतेशी ते प्रामाणिक आहे हे दाखवता येईल, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
लोकसभेला भाजपला पाठिंबा पण विधानसभेला नाही? राज ठाकरेंनी सांगितली ईडीची स्टोरी
बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना म्हटलंय की, कोणीही चुकीची कामं करू नयेत. खंडणी मागु नये, चुकीची कामे केल्यास मकोका लावण्यात येईल. यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्यांनी अगोदर चुकीची कामं केली आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर पहिल्यांदा मकोका लावा. कालच त्यांच्या सत्तेतील आमदाराने डीपीटीसीमधून सत्तर कोटी रूपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केलाय. काम न करता, असं वडेट्टीवार म्हणालेत.
Video : तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही; स्वार्थासाठी येणाऱ्या भाजपला ‘राज’ यांचा थेट संदेश
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराची किती मोठी यादी आहे, म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही. कृती करावी लागेल. याची सुरूवात मंत्र्यांचा राजीनामा घेवून करावी लागेल, तर तुमच्या बोलण्याला अर्थ राहील असं वडेट्टीवारांनी नाव नं घेता अजित पवारांना सूचक विधान केलंय. तर तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात, हे तुम्हाला दाखवता येईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास दोन महिने होत आलेत. तरीही अजून काही आरोपी फरार आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. याप्रकरणी नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे.