Download App

“मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो”, काँग्रेस नेत्याचा दावा

Vijay Wadettiwar on Beed Crime : मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडने पु्ण्यात  (Walmik Karad) सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सु्नावली. काल कोठडीतील पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक बातमी राजकारणात चर्चेची होत आहे. मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग, प्रशासनाचं स्पष्टीकरण; रोहित पवारांच्या ट्विटने ट्विस्ट!

आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. वडेट्टीवार पुढे म्हणाले, मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचविण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत पोहोचण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते अशी माहिती मला उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली असे वडेट्टीवार म्हणाले.

यानंतर वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही जोरदार टीका केली. पोलीस काही कराडला पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असा प्रश्न विचारला असता वडेट्टीवार म्हणाले, वाल्मीक कराडला आपला बॉस आणि बाप मानूनच पोलीस वागत होते हा येथील इतिहास आहे. 22 दिवस पोलीस काही त्याला पकडू शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे.

बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग, प्रशासनाचं स्पष्टीकरण; रोहित पवारांच्या ट्विटने ट्विस्ट!

कराडची चौकशी करायची की सेवा : वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या मुद्द्यावर एक ट्विटही केलं. महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळेल!

वाल्मीक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

follow us