Download App

विधानसभेला गाफील राहून चालणार नाही, फार मेहनत घ्यावी लागेल; आमदार कदमांनी टोचले कान

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं माडणं चुकीच आहे. त्यामुळं या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. - आमदार कदम

  • Written By: Last Updated:

MLA Vishwajit Kadam : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी (Vidhanparishad Election) शुक्रवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोन उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान, या निवडणूक निकालावर आता कॉंग्रेसचे आमदार विश्वजित कदम (MLA Vishwajit Kadam) यांनी भाष्य केलं.

विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा; भाजपला धक्का देत सहा जागा जिंकल्या 

विश्विजीत कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते जमिनीवर आलेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं माडणं चुकीच आहे. त्यामुळं या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी फार मेहनत घ्यावी लागेल, असं कदम म्हणाले.

पूजा खेडकर प्रकरणाचे नगर कनेक्शन; जिल्हा रुग्णालयातून मिळाले होते दिव्यांग प्रमाणपत्र 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून आमच्या सर्व घटक पक्षांनी एकदिलाने लढलं पाहिजे, पक्ष आणि उमेदवाराला मेहनत घ्यावी लागले. कार्यकर्त्यांची सांगड घालावी लागले. हे सगळं जुळलं तरच विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल, असं कदम म्हणाले.

फुटलेल्या मतदानाची नेते दखल घेतील…
या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या संजय राऊतासोबतच महायुतीच्या नेत्यांकडून हाच दावा केला जात आहे. याविषयी विचारलं असता कदम म्हणाले की, कॉंग्रेसचे आमदार फुटले आहेत, याला अद्याप पुष्टी मिळाली नाही. विधानपरिषदेचे मतदाने हे गुप्त पुध्दतीने होत असतं. त्यामुळं नेमकं कुठल्या पक्षाचं मतदान फुटलं? हे कळू शकले नाही. मात्र, त्या-त्या पक्षाचे नेते याची दखल घेतील आणि शहानिशा करती, असं कदम म्हणाले.

follow us