Badlapur : पीडितांना न्याय देण्यापेक्षा गुन्हा लपवण्याचे यंत्रणेकडून प्रयत्न केले असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलीयं. दरम्यान, बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक (Badlapur Rape Case) अत्याचाराची घटना घडली. या घटनेवरुन राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडूनही टीकेची झोड उठवण्यात येत असून आता राहुल गांधींनीही सरकारवर निशाणा साधलायं. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 21, 2024
राहुल गांधी पोस्टमध्ये म्हणाले, “आता एफआयआर दाखल करण्यासाठीही लोकांना आंदोलन करावे लागणार आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये केलायं. तसेच बदलापूरमध्ये लहान मुलींवर अत्याचार झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र लोक रस्त्यावर उतरेपर्यंत ही भूमिका घेतली गेली नाही. आता एफआयआर दाखल करण्यासाठीही लोकांनी रस्त्यावर उतरावे का? पीडितांना आता पोलीस ठाण्यात जाणेही कठीण का होऊन बसले आहे? असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
तसेच न्याय देण्यापेक्षा गुन्हा लपविण्यासाठीच अधिक प्रयत्न केले जातात. याचा फटका महिला आणि उपेक्षित घटकांतील लोकांना जास्त बसत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. एफआयआर दाखल न करून घेतल्यामुळे पीडितांचे खच्चीकरण तर होतेच, पण आरोपीचे बळ वाढते, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
बदलापूर स्थानकावरील आंदोलन व्यवस्थित नियोजन करुनच; पोलिसांनी टिपलेल्या गोष्टींनी संशय बळावला
नेमकं काय घडलं?
बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आरोपीने आणखीही काही लैंगिक शोषण व असेच कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे आरोपीची अधिक चौकशी करण्याची गरज आहे असा मुद्दा उपस्थित करत पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली. यानंतर न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.