Download App

सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मतदार आकाशातून पडली का? आज व्होटर डे नसून चिटर डे, काँग्रेसचा ECI वर गंभीर आरोप

Praveen Chakraborty: विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेसाठी सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मते कशी वाढली आहे. याचे उत्तर ECIने दिली पाहिजेत.

  • Written By: Last Updated:

Praveen Chakraborty and Prithviraj Chavan On Election Commission of India: विधानसभा निवडणुकीत ( Assembly Election) सपाटून मार खाणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) पक्षाने निवडणूक आयोग आणि महायुतीवर आरोप करण्याचे सोडलेले नाही. राष्ट्रीय मतदार दिवशी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) व प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत 32 लाख मते वाढली आहेत. पण आताच्या विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेसाठी सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मतदार कशी वाढली आहे. याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला फसविले गेले आहेत. त्यामुळे हा व्होटर डे नसून चिटर डे असल्याची काँग्रेसचे प्रवीण चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

मुंबईचे पोलीस हेच खरे भाई; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण, जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 48 लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते 2024 ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात ३२ लाख मतदार वाढले. तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी चक्रवर्ती यांनी केली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9.7 कोटी मतदार आहेत. तर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 18 वर्षांवरील राज्यातील लोकसंख्या 9.54 कोटी इतकी आहे. ही पण आकड्याची मोठी जादू असल्याचा टोलाही चक्रवर्ती यांनी केलाय


हे मतदार आकाशातून पडलेत काय ?

लोकसभा निवडणुकीनंतर 132 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 20 ते 25 हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला यातील 62 विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती पण विधानसभेला याच 132 मतदारसंघातून 122 जागी महायुतीचा विजय झाला, हे महत्वाचे आहे. मतदार याद्यातील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा 76 लाख अतिरिक्त मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीची 24 लाख मते महायुतीकडे शिफ्ट झाली. पण वाढलेली 48 लाख मते हे केवळ महायुतीलाच कशी पडली. त्याबाबत निवडणूक आयोगाने पुराव्यासह उत्तर दिले पाहिजे. कोणत्या मतदारसंघावर किती मतदार वाढले, वाढलेल्या मतदार याद्याची माहिती आयोगाने आम्हाला दिल्या पाहिजे. मतदार याद्यांबाबतचे हे मतदार कोण होते. ते आभाळातून पडले का ? ते गोस्ट मतदार आहेत. बनावट मतदार होते की इतर राज्यांतून
आणली आहेत, याचा संशय आहे.

follow us