Ravindra Dhangekar and Thackeray’s former MLA Mahadev Babar Will join Shinde : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसायला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक पदाधिकारी महायुतीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उद्धव ठाकरेंचे पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्या पाठोपाठ आता पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) त्यांचा मुलगा आणि 25 माजी नगरसेवक एकनाथ शिंदे (Ravindra Dhangekar) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लेट्सअपशी बोलताना केला आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अन्य काही सहकारी आमच्या संपर्कात असल्याच त्यांनी म्हटलं होतं मात्र इतर सहकाऱ्यांनी भाजपमध्ये न जाता शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार महादेव बाबर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यासोबत 25 माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली आहे.
धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी, नामदेव शास्त्रींकडून काय सल्ला घेणार?
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे देखील आपल्या संपर्कात आहेत. त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ते अद्याप शिवसेनेत प्रवेश करतील हे अधिकृत झालं नसलं तरी ते आमच्या संपर्कात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे.
ज्या रवींद्र धंगेकरांनी कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला अंगावर घेतलं होतं आणि विजय मिळवला होता आता तेच धंगेकर आपल्या पक्षाला अर्थात काँग्रेसला सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धंगेकरांचा लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला होता. मात्र धंगेकर असा निर्णय घेतील असं कुणालाही वाटलं नव्हतं मात्र धंगेकर आता निर्णय घेण्याच्या मूडमध्ये असल्याचे चर्चा रंगत आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याचा दुजोरा शिंदेंचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिल्याने काहीतरी गडबड असल्याचं चित्र स्पष्ट आहे.
देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर हे हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते मात्र त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सुटल्याने तिथे पवारांची शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला तेव्हापासूनच महादेव बाबर हे अस्वस्थ होते आणि नाराज होते. याचीच परिणीती म्हणून बाबर यांनी आपल्या मुलासह शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार धंगेकर यांनी घेतलेला निर्णय मात्र महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. याच कारण पुण्यात धंगेकरांएवढा आक्रमक नेता काँग्रेसकडे दुसरा नाही. त्यामुळे धंगेकर जर खरचं शिवसेनेमध्ये गेले तर आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची अवस्था बिकट होऊ शकते. याबाबत प्रतिक्रियेसाठी धंगेकरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.